BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

▪️माउंट आबू येथे एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ब्रह्माकुमारीजचे विविध प्रभागांचे भव्य कार्यक्रम

आबू रोड (बीकेमहामीडिया वृत्तसेवा) प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या जागतिक मुख्यालय असलेल्या आबू राज (माउंट आबू) राजस्थान येथे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ब्रह्माकुमारीज् च्या विविध प्रभागांद्वारे आध्यात्मिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेले, पर्वतरांगा, विशाल खडक, धबधबे, झरे आणि विविध पर्यटन स्थळांनी समृद्ध असे माउंट आबू हे स्थळ आध्यात्मिक उर्जेची अनुभूती देणारे आहे. अशा शांत आणि प्रेरणादायी वातावरणात होणारे हे कार्यक्रम सहभागींसाठी जीवनपरिवर्तनाचा अनुभव देणारे ठरणार आहेत.

ब्रह्माकुमारीज संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये दरवर्षी हजारो लोकांसाठी राजयोग ध्यान, व्यक्तिमत्व विकास, तणावमुक्त जीवनशैली आणि मूल्याधारित जीवनशिक्षण यासाठी विविध शिबिरे, कार्यशाळा व परिषदांचे आयोजन केले जाते.

📋 मनमोहिनीवन परिसरातील कार्यक्रम – 2026

२२ ते २८ एप्रिल, २० ते २६ मे, १० ते १६ जून आणि ०५ ते ११ ऑगस्ट – Coronary Artery Disease (CAD) रुग्णांसाठी विशेष कार्यक्रम

📋 मानसरोवर परिसरातील कार्यक्रम – 2026

०८ ते १२ एप्रिल – स्पिच्युअल ॲप्लिकेशन विंग योग शिबिर, २७ ते ३१ मे – बाल व्यक्तित्व विकास शिबिर (वयोगट ८ ते १५ वर्षे), २२ ते २६ जुलै – नर्स कॉन्फरन्स, १२ ते १६ ऑगस्ट – चार्टड अकाऊंट तथा वित्तीय विभागासाठी कॉन्फरन्स, ०९ ते १३ सप्टेंबर – राष्ट्रीय मीडिया संमेलन

📋 ज्ञान सरोवर परिसरातील कार्यक्रम – 2026

०९ ते १३ एप्रिल – आयटी विंग कॉन्फरन्स, १६ ते २० एप्रिल – सिक्युरिटी सर्व्हिस विंग कॉन्फरन्स, २३ ते २७ एप्रिल – एज्युकेशन विंग कॉन्फरन्स, ३० एप्रिल ते ०४ मे – मीडिया विंग कॉन्फरन्स, ०७ ते ११ मे – यूथ विंग कॉन्फरन्स, १४ ते १८ मे – ग्रामविकास प्रभाग कॉन्फरन्स, २१ ते २५ मे – सायंटिस्ट विंग कॉन्फरन्स, २८ मे ते ०१ जून – ज्युरिस्ट विंग कॉन्फरन्स, ०४ ते ०८ जून – अॅडमिनिस्ट्रेटर विंग कॉन्फरन्स, ११ ते १५ जून – ट्रान्सपोर्ट विंग कॉन्फरन्स, १८ ते २२ जून – महिला विंग कॉन्फरन्स, २५ ते २९ जून – आर्ट & कल्चरल विंग कॉन्फरन्स, ०९ ते १३ जुलै – पॉलिटिकल विंग कॉन्फरन्स, १६ ते २० जुलै – बिझनेस & इंडस्ट्री विंग कॉन्फरन्स, ३० जुलै ते ०३ ऑगस्ट – शिपिंग, एव्हिएशन अँड सर्विस (SAT) विंग कॉन्फरन्स, १३ ते १७ ऑगस्ट – रिलिजियस विंग कॉन्फरन्स, ०३ ते ०७ सप्टेंबर – स्पार्क विंग कॉन्फरन्स, १७ ते २१ सप्टेंबर – मेडिकल विंग कॉन्फरन्स

🛎️सहभागासाठी नोंदणी :

वरील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रांमार्फत नोंदणी होत असते. त्यासाठी नजीकच्या ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.

या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ब्रह्माकुमारीज संस्था आध्यात्मिकता, मानसिक आरोग्य, मूल्याधारित जीवनशैली आणि समाजजागृती यांचा प्रसार करत असून, व्यक्ती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.

✍🏻बीकेमहामीडिया मराठी वृत्तसेवा
www.bkmahamedia.com

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media