BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

,

Ahilyanagar

Ahilyanagar

पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूनस्र्थापना

रविवार दि. 20 जुलै, 2025, सकाळी 10 वाजता

   समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत.  `पेन` पत्रकारितेपासून `पेनलेस` पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पूनस्र्थापित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या विचार मंथनासाठी अहिल्यानगर जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे करण्यात आले आहे. या संमेलनासाठी मधूबन पावून भूमी माऊंट आबू (राजस्थान)चे  ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, मीडिया प्रभाग राष्ट्रीय समन्वयक, आणि जळगावचे  प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे,  मीडिया प्राध्यापक व   महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.  
  • * दिनांक : रविवार दि. 20 जुलै, 2025, वेळ : सकाळी 10 ते 12 (तदनंतर सर्वांसाठी ब्रह्माभोजन)
    * स्थान : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शिवदर्शन भवन, 63/40 महावीर नगर, शेवडी रोड, अहिल्यानगर-414001
    * संपर्क : 7276430213

ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी
संचालिका, अहिल्यानगर सेवाकेंद्र

(संमेलनासाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही तथापि, नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी स्थानिय ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात संपर्क साधावा.)

अधिक माहितीसाठी: www.mediawing.org | www.BkMahaMedia.com\Ahilyanagar
या संमेलनासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर/सोशल मीडिया, मीडिया शिक्षण संस्था, जनसंपर्क, जाहिरात आदि सर्व मीडिया प्रतिनिधी होणार आहेत. आपण माध्यमक्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक आहात. आपणही या विचार मंथनात सहभागी व्हावे.आणि या संमेलनासाठी आपली उपस्थिती नोंदवावी ही सस्नेह विनंती.

माऊंट आबू येथील विविध नैसर्गीक आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळांचाी माहितसाठी abu_darshan माऊंट आबू दर्शन – BK Maha Media

Tags

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media