BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

,

bkwashim

वाशिम | प्रतिनिधी

`सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता
वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चासत्राचे आयोजन

सायबर युगात झपाट्याने बदलणाऱ्या पत्रकारितेच्या स्वरूपात मूल्यांचा ऱ्हास होत चालल्याची जाणीव अनेक माध्यम प्रतिनिधींना होत आहे. याच पार्श्वभूमीवर “सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता” या विषयावर वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चासत्राचे आयोजन शनिवार, दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात आले आहे. हे चर्चासत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ‘वरदानी भवन’, सिव्हिल लाईन्स, सर्किट हाऊसच्या मागे, वाशिम येथे होणार आहे.

या चर्चासत्राचे आयोजन ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग (RE & RF), माऊंट आबू व ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :
माध्यमांना समाजाचे दर्पण मानले जाते. मात्र ‘पेन’ पासून ‘पेनलेस’ पत्रकारितेकडे वाटचाल करताना अनेक मूल्यमापनांचे प्रश्न उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर माध्यमांतील मूल्यांची पुनर्स्थापना, नैतिक अधिष्ठान आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर सायबर पत्रकारितेच्या नव्या शक्यता, डिजिटल माध्यमांचे प्रभाव, आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या गरजा या मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा होणार आहे. माध्यमांच्या विश्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधताना नैतिक अधिष्ठान कसे टिकवावे, यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते म्हणून ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू), प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयक, जळगाव), श्री. राजेश राजोरे (खामगाव, अकोला क्षेत्रीय मीडिया समन्वयक) तसेच स्थानिक ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.

यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधींना सहभाग घेता येईल. यासाठी कुठलेही नोंदणी शुल्क असणार नाही, मात्र सहभाग ई-प्रमाणपत्रासाठी नोंदणी आवश्यक आहे. https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. लिंक प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नोंदणीसाठी संपर्क : ९८५०६९३७०५ हा आहे.

या चर्चासत्रात वृत्तपत्रे, प्रिंट मीडिया, टी.व्ही., रेडिओ, केबल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर व सोशल मीडिया, पत्रकारिता शिक्षण संस्था, जाहिरात व जनसंपर्क क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे ब्रह्माकुमारी स्वातीदीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, वाशिम यांनी आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
🌐 www.mediawing.org | www.BkMahaMedia.com/bkwashim
📞 संपर्क : ९८२२५ ९३९०३
📩 ब्रह्माकुमारी स्वातीदीदी,, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, वाशिम

Tags

3 responses to “bkwashim”

  1. Gajanan Apparao Wagh Avatar
    Gajanan Apparao Wagh

    महत्त्वाचे चर्चासत्र.
    येणार आहे.
    Gajanan Apparao Wagh
    Mobile number 7588960918

  2. Gajanan Apparao Wagh Avatar
    Gajanan Apparao Wagh

    महत्त्वाचे चर्चासत्र.
    येणार आहे.
    Gajanan Apparao Wagh
    Mobile number 7588960918

  3. Gajanan Apparao Wagh Avatar
    Gajanan Apparao Wagh

    महत्त्वाचे चर्चासत्र.
    Gajanan Apparao Wagh
    Mobile number 7588960918

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media