तंत्रज्ञानाचा विवेकी आणि प्रभावी वापर सायबर पत्रकारितेत आवश्यक
-ब्रह्माकुमारीज् आयोजित पुणे मीडिया संमेलनात माध्यम तज्ज्ञांचा आशावाद
सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी विषयावर विचार मंथन
पिंपरी पुणे (दि. ) सायबर पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानात होत असलेली स्थित्यंतरे अपरिहार्य असून बदलत्या प्रवाहात तंत्रज्ञानाचा विवेक आणि प्रभावी उपयोग केल्यास शाश्वत मूल्यांना धरुन पत्रकारिता केली जाऊ शकते असा आशावाद ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग, पुणे आयोजित जिल्हास्तर मीडिया संमेलनातील वक्त्यांनी केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पिंपरी सेवाकेंद्र आणि माऊंट आबू येथील मीडिया प्रभागामार्फत सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन केले गेले.
मीडिया संमेलनाचे उद्घाटन ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू, डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव, श्री. नंदकुमार सातुर्डेकर- विभाग प्रमुख, दैनिक केसरी, पिंपरी चिंचवड तथा पत्रकार संघ अध्यक्ष, श्री नाना कांबळे, संपादक पवना समाचार, पिंपरी पुणे, श्री. संजय चांदेकर, माजी रेडिओ विभाग प्रमुख, तथा एआय शिक्षक, एफ. टी. आय. पुणे, बी.के. सोमनाथ म्हस्के, जिल्हा समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे, श्री. दत्ता धामनस्कर ज्येष्ठ पत्रकार, पुणे, बी.के. सुरेखादीदी, संचालिका पिंपरी सेवाकेंद्र, बी.के. डॉ. दिपक हरके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन झाले.
विषय प्रास्ताविक करतांना ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी म्हटले की, जगात सर्व क्षेत्रात नैतीक मूल्यामध्यें होत असलेली घसरण पाहता ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी भरीव कार्य केले आहे. चुकीच्या बातम्या क्षणात सर्वदूर पसरता मात्र सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोहचत नाही याबद्दल चिंता व्यक्त करतांना त्यांनी सायबर युगातील पत्रकारितेची जबाबदारी वाढल्याचे स्पष्ट केले. ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे माध्यमक्षेत्रासाठी होत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा त्यांनी या प्रसंगी आढावा घेतला.
सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य आव्हाने आणि संधी या विषयावर बीज भाषण करतांना डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव यांनी पत्रकारितेच्या प्रवाहात तंत्रज्ञानाच्या व्यापारी करणामुळे पत्रकारितेचे सत्य, नि:पक्षता आणि पारदर्शिता हे तत्व हरवत चालले असल्याचे म्हटले. टीआरपीचा पत्रकारांवर पडत असलेल्या दबाव मूल्यनिष्ठ पत्रकारिता करण्यास मुख्य अडसर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाच्या फेक न्यूज, युजर फिडबँक मधील अफारातफर, क्लिक बेट, सायबर पत्रकारितेतील लुप्त पावत असलेल्या मानवी संवेदना, माध्यम साक्षरता, मीडिया आचारसंहिता बरोबर त्यांनी कृतिम बुद्धीमत्ता अर्थात एआयने बनविलेल्या वृत्तपत्रांपर्यंत सायबर पत्रकारितेतील मूल्य, आव्हाने आणि संधी या विषयावर विस्तृत भाष्य केले.
श्री. नंदकुमार सातुर्डेकर, विभाग प्रमुख, दैनिक केसरी, पिंपरी चिंचवड तथा पत्रकार संघ अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारीतेतील स्थित्यंतराचा आढावा घेतांना पत्रकारिता करतांना तुरंगावास भोगलेल्या संपादक आणि स्वातंत्र्यसैनिकांचे उदाहरण दिले. सध्या वृत्तपत्रांच्या झगमगाटात पत्रकरितेचा आत्मा विकला जात असल्याचे प्रतिपादन त्यांनीकेले.
श्री नाना कांबळे, संपादक पवना समाचार, पिंपरी पुणे यांनी सायबर पत्रकारितेमुळे छोटी आणि मध्यम वृत्तपत्रांसमोरील निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. मात्र कालानुरुप तंत्रज्ञानाचे फायदेही त्यांनी विषद केलेत.
श्री. संजय चांदेकर, माजी रेडिओ विभाग प्रमुख, तथा एआय शिक्षक, एफ. टी. आय. पुणे यांनी सायबर पत्रकारितेच्या या युगात तंत्रज्ञानाच्या आव्हानावरच स्वार होऊन होऊ घातलेल्या संकटावर मात करण्याबद्दल आपले परखड विचार व्यक्त केलेत.
बी.के. सोमनाथ म्हस्के, जिल्हा समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे यांनी स्थानिक क्षेत्रात ब्रह्माकुमारीज् मार्फत होत असलेल्या माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यक्रम, उपक्रमांचा आढावा घेतला.
श्री. दत्ता धामनस्कर ज्येष्ठ पत्रकार, पुणे यांनी नागरीक पत्रकारितेवर आपले समायोचित विचार व्यक्त केले.
तत्पूर्वी प्रभू स्मृती ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. रिया हीने स्वागत नृत्य केले. स्वागत संबोधन – ब्रह्माकुमारी सुरेखादीदीजी, संचालिका, पिंपरी सेवाकेंद्र, यांनी केले. विभाग प्रमुख आणि संघटनांचे अध्यक्ष यांचा सन्मान या प्रसंगी आयोजित केला. बी.के.डॉ. शांतनुभाई यांना ग्लोबल बुक ऑफ इक्सलेन्स, इंग्लड यांचे तर्फे डॉ. दिपक हरके यांनी सर्टिफिकेट ऑफ हॉनर देऊन सन्मान केला, राजयोग अभ्यास मार्गदर्शन बी.के. शितलदीदी यांनी केले .आभार प्रदर्शन ब्र.कु. अनुप भाई, यांनी तर सूत्रसंचलन – ब्र.कु. प्रा. संजय शिंदे, पिंपरी यांनी केले.
—————–
Hindi News
साइबर पत्रकारिता में तकनीक का समझदारी और प्रभावी प्रयोग आवश्यक
– ब्रह्माकुमारीज़ द्वारा आयोजित पुणे जिलास्तीय मीडिया संमेलन में मीडिया विशेषज्ञों की आशावादिता
साइबर युग में पत्रकारिता: मूल्य, चुनौतियाँ और अवसर: विषय पर विचार-मंथन
पिंपरी, पुणे (दि. ) साइबर पत्रकारिता करते समय तकनीक में बदलाव अपरिहार्य हैं और यदि बदलते परिवेश में तकनीकी का समझदारी और प्रभावी ढंग से प्रयोग किया जाए, तो शाश्वत मूल्यों को ध्यान में रखते हुए पत्रकारिता की जा सकती है, ऐसे विचार ब्रह्माकुमारीज़ मीडिया विंग, पुणे द्वारा आयोजित जिला स्तरीय मीडिया संमेलन में वक्ताओं ने आशावादिता व्यक्त की।
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय के पिंपरी सेवा केंद्र और माउंट आबू स्थित मीडिया विभाग द्वारा “साइबर युग में पत्रकारिता: मूल्य, चुनौतियाँ और अवसर” विषय पर पुणे जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाका आयोजन किया गया।
मीडिया संमेलन का उद्घाटन ब्रह्माकुमार डॉ. शांतनुभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माउंट आबू, डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जलगाँव, श्री. नंदकुमार सातुरडेकर- विभागाध्यक्ष, दैनिक केसरी, पिंपरी चिंचवड़ एवं पत्रकार संघ के अध्यक्ष, श्री नाना कांबले, संपादक, पवन समाचार, पिंपरी पुणे, श्री संजय चांदेकर, पूर्व रेडियो विभागाध्यक्ष एवं एआई शिक्षक, एफ.टी.आई. पुणे, बी.के. सोमनाथ म्हस्के, जिला समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे, श्री दत्ता धामनस्कर वरिष्ठ पत्रकार, पुणे, बी.के. सुरेखा दीदी, निदेशक, पिंपरी सेवाकेंद्र, बी.के. डॉ. दीपक हरके ने दीप प्रज्वलित कर कार्यक्रम की शोभा बढ़ाई।
विषय प्रवेश कराते हुए, ब्रह्माकुमार डॉ. शांतनुभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माउंट आबू ने कहा कि विश्व के सभी क्षेत्रों में नैतिक मूल्यों में गिरावट को देखते हुए, ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग ने मूल्य-आधारित समाज के निर्माण के लिए बहुत काम किया है। उन्होंने इस बात पर चिंता व्यक्त की कि झूठी खबरें पल भर में हर जगह फैल जाती हैं लेकिन सकारात्मक खबरें लोगों तक नहीं पहुँच पातीं। उन्होंने बताया कि साइबर युग में पत्रकारिता की जिम्मेदारी बढ़ गई है। इस अवसर पर उन्होंने ब्रह्माकुमारीज़ मीडिया प्रभाग द्वारा मीडिया क्षेत्र के लिए किए जा रहे कार्यक्रमों और पहलों की समीक्षा की।
साइबर युग में पत्रकारिता: मूल्य, चुनौतियाँ और अवसर विषय पर मुख्य भाषण देते हुए, महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग, डॉ. सोमनाथ वडनेरे, जलगाँव ने कहा कि पत्रकारिता के प्रवाह में प्रौद्योगिकी के व्यवसायीकरण के कारण पत्रकारिता के सत्य, निष्पक्षता और पारदर्शिता के सिद्धांत लुप्त होते जा रहे हैं। उन्होंने चिंता व्यक्त की कि टीआरपी के कारण पत्रकारों पर पड़ने वाला दबाव मूल्य-आधारित पत्रकारिता में मुख्य बाधा बन रहा है। सोशल मीडिया पर फर्जी खबरें, उपयोगकर्ता प्रतिक्रिया में अतिशयोक्ति, क्लिक-बैट, साइबर पत्रकारिता में मानवीय संवेदनशीलता का ह्रास, मीडिया साक्षरता, मीडिया आचार संहिता के साथ-साथ उन्होंने कृत्रिम बुद्धिमत्ता यानी एआई द्वारा निर्मित समाचार पत्रों से साइबर पत्रकारिता में मूल्य, चुनौतियों और अवसरों पर भी विस्तार से बात की।
दैनिक केसरी, पिंपरी चिंचवाड़ के विभागाध्यक्ष एवं पत्रकार संघ के अध्यक्ष श्री नंदकुमार सातुर्डेकर ने स्वतंत्रता-पूर्व एवं स्वतंत्रता-उत्तर पत्रकारिता की स्थिति की समीक्षा करते हुए, पत्रकारिता करते हुए जेल गए संपादकों और स्वतंत्रता सेनानियों के उदाहरण दिए। उन्होंने इस बात पर ज़ोर दिया कि समाचार पत्रों के वर्तमान उन्माद में पत्रकारिता की भावना को बेचा जा रहा है।
पवना समाचार, पिंपरी पुणे के संपादक श्री नाना कांबले ने साइबर पत्रकारिता के कारण छोटे और मध्यम समाचार पत्रों के समक्ष आ रही समस्याओं की समीक्षा की। साथ ही, उन्होंने समय के अनुरूप तकनीक के लाभों पर भी विस्तार से प्रकाश डाला।
एफ.टी.आई. पुणे के रेडियो विभाग के पूर्व प्रमुख एवं कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षक श्री संजय चांदेकर ने साइबर पत्रकारिता के इस युग में तकनीक की चुनौती का लाभ उठाकर आसन्न संकट पर विजय पाने पर अपने सशक्त विचार व्यक्त किए।
बी.के. सोमनाथ म्हस्के, जिला समन्वयक, मीडिया प्रभाग, पुणे ने स्थानीय क्षेत्र में ब्रह्माकुमारीज़ के माध्यम से मीडिया प्रतिनिधियों के लिए आयोजित कार्यक्रमों एवं गतिविधियों की समीक्षा की।
श्री दत्ता धामनस्कर, वरिष्ठ पत्रकार, पुणे ने नागरिक पत्रकारिता पर अपने विचार व्यक्त किए।
प्रारंभ में कार्यक्रम की शुरुआत प्रभु स्मृति से हुई। सुश्री रिया ने स्वागत नृत्य प्रस्तुत किया । स्वागत संबोधन ब्रह्माकुमारी सुरे खा बहनजी, संचालिका, पिंपरी सेवा केंद्र ने किया . विभागाध्यक्षों और संस्थाओं के अध्यक्षों को इस अवसर पर सम्मानित किया गया। ग्लोबल बुक ऑफ एक्सीलेंस, इंग्लैंड, राजयोग अभ्यास बी.के. शीतल दीदी, पुणे की ओर से बी.के. डॉ. शांतनुभाई को डॉ. दीपक हरके द्वारा सम्मान पत्र प्रदान किया गया। धन्यवाद ज्ञापन ब्र.के. अनूप ने किया और कार्यक्रम का संचालन ब्र.के. प्रो. संजय शिंदे, पिंपरी ने किया।








सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी
पुणे जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन
- 🗓️ शुक्रावार दि. 18 जुलै, 2025 : दुपारी 03 ते 05
- संमेलन स्थान : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी, पुणे
- आयोजक : मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पिंपरी, पुणे
▪️ सायबर युगातील पत्रकारिता :
समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत. पेन पत्रकारितेपासून पेनलेस पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या. सायबर युगातील या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पूनस्र्थापित करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
▪️ आयोजक : मीडिया प्रभाग :
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मुख्यालय माऊंट आबू (राजस्थान) येथे आहे. सध्या भारतात आणि विश्वात 140 देशांमध्ये 8.500 पेक्षा अधिक सेवाकेंद्र मानवतेच्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी समर्पित आहेत. ही संस्था कोणत्याही जाति, धर्म, रंग-भेद, संप्रदाय, राष्ट्रीयतेच्या भेदभावापासून अलिप्त असून मानवाच्या सर्वागिण उन्नतीसाठी, समर्पित आहे. संस्था संयुक्त राष्ट्राच्या अशासकीय संस्थांच्या संघटनेचे (एनजीओ) चे सदस्य बरोबरच आर्थिक आणि सामाजिक परिषद तसेच युनिसेफचे सल्लागार सदस्य म्हणूनही कार्यरत आहे.
माध्यमांसाठी महाराष्ट्र राज्यात गाव, तालुका, जिल्हास्तरीय कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन मीडिया प्रभागामार्फत केले जाते. त्याचाच भाग म्हणून सदरहू संमेलनाचे आयोजन होत आहे. आपण माध्यम प्रतिनिधी या नात्याने सदर महासंमेलनात सहभागी व्हाल व मूल्यनिष्ठ समाज निर्मितीतेचे नेतृत्व कराल.
▪️ मार्गदर्शन :
या विचार मंथनासाठी पुणे जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् पिंपरी, पुणे सेवाकेंद्र, आणि ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग, माऊंट आबूतर्फे करण्यात आले आहे. या संमेलनासाठी ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंटआबू (राजस्थान) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव, मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, बीके सोमनाथ म्हस्के, पुणे जिल्हा मीडिया समन्वयक याबरोबरच या संमेलनात सहभागी ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधींचेही विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
▪️ सहभाग :
संमेलनासाठी वृत्तपत्रे आणि प्रिंट मीडिया, टि.व्ही,, रेडिओ, केबल, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर/सोशल मीडिया, तसेच पत्रकारिता आणि मीडिया शिक्षण देणा-या संस्था, जनसंपर्क, जाहिरात आदि क्षेत्रातील मीडिया प्रतिनिधी होणार आहेत.
आपण माध्यमक्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक आहात. आपणही या विचार मंथनात सहभागी व्हावे.आणि या संमेलनासाठी आपली उपस्थिती नोंदवावी ही सस्नेह विनंती.
▪️ या संमेलनासाठी सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागासाठी कुठलेही नोंदणी शुल्क नाही, तथापि, नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी QR कोड अथवा https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे होऊ शकतें. उपरोक्त दोन्हीला पर्याय म्हणून 9850693705 या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
*▪️ संमेलनासंदर्भात अधिक माहितीसाठी www.BkMahaMedia.com\bkpune या वेबसाईट ला भेट द्यावी
माऊंट आबू येथील विविध नैसर्गीक आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळांचाी माहितसाठी abu_darshan माऊंट आबू दर्शन – BK Maha Media



