तंत्रज्ञान बरोबर आत्मज्ञान असेल तर डिजिटल युगात मूल्यनिष्ठ पत्रकारिता शक्य होईल.
– मीडिया चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
डिजिटल युगातील पत्रकारिता आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा यावर बुलढाणा जिल्हास्तर मीडिया चर्चासत्रात संपन्न
खामगाव (दि. ३ ऑगस्ट) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या बदलांचा आढावा घेताना पत्रकारांनी मूल्यनिष्ठता, जबाबदारी आणि मानवी दृष्टिकोन जपणे आवश्यक आहे, असा सूर आज खामगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय मीडिया संमेलनात उमटला. “डिजिटल तंत्रज्ञान : आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा” या विषयावर ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांच्या वतीने रायगड कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज शिवालय सेवाकेंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती आणि कुमारी देविका कापडे हिच्या ‘ स्वागतम शत स्वागतम ‘ या स्वागत नृत्याने झाली. यानंतर ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी यांनी स्वागत संबोधन केले.
विषयाची प्रास्तावना ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी केली. त्यात त्यांनी म्हटले की, सूचना दिल्याने समस्या सुटत नाही आणि समाधान होत नाही म्हणून समस्याप्रधान समाधानयुक्त पत्रकारिता करणे महत्वाचे आहे. मीडियाच्या कर्तव्याबाबतीत गांधीजी म्हणाले होते की, ‘पत्रकारिता म्हणजे फक्त
सेवा, सेवा आणि सेवा होय’. पोलीस व प्रशासन नसताना कही दिवस देश चालणे शक्य होईल परंतु मिडिया शिवाय एकही दिवस देश चालणे शक्य नाही. त्याच बरोबर त्यांनी ब्रह्माकुमारी मीडिया विंग द्वारा होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमांचा आढावा घेतला.
बीज भाषणात ज्येष्ठ संपादक श्री. राजेश राजोरे यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेतील आव्हानांवर प्रकाश टाकत “वेगवान बातम्या देताना अचूकता आणि जबाबदारी अबाधित ठेवणे हे तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आजचे मोठे आव्हान आहे”, तंत्रज्ञानासोबत पत्रकारांनी आत्मपरीक्षण आणि नैतिकतेचे भान ठेवावे, असेही त्यांनी सांगीतले सांगितले.
उद्घाटन समारंभ दीप प्रज्वलनाने झाला. उद्घाटकीय संबोधनात श्री. रणजीतसिंह राजपूत, अध्यक्ष, अ.भा. मराठी पत्रकार संघ, बुलढाणा जिल्हा यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजास नवीन दिशा देण्याचे कार्य होते, अभिवव्यक्तीचे रक्षण करणे पत्रकारितेचे काम आहे. जी व्यवस्था अर्थात प्रशासन आम्हास नियंत्रीत करते त्यातच गडबड आहे. खरी पत्रकारिता करणाऱ्यांचे रक्षण व्हावे, असे प्रतिपादन केले.
श्री. अरुणजी जैन, वरीष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, बुलढाणा विभाग, यांनी अशा चर्चासत्रातून ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाद्वारे वैचारिक क्रांती आणण्याचे काम होत आहे असे म्हटले.
श्री. अनिलजी गवई, उपसंपादक, दै. लोकमत, खामगाव यांनी आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ति प्रेरणा ब्रह्माकुमारीज् च्या अशा चर्चासत्रातून निश्चित मिळेल, असे प्रतिपादन केले.
श्री. संदिपजी वानखेडे (पुढारी न्यूज चॅनल) यांनी सांगितले की, सकारात्मक पत्रकारिता लोप पावत चालली आहे. डिजिटल पत्रकारितेतील ब्रेकिंग न्यूज मागे धावतांना अन्याय होतो, त्याबातीत काळजी घेणे आवश्यक आहे.
श्री. राजेंद्रजी काळे, जिल्हा प्रतिनिधी, देशोन्नती, बुलढाणा यांनी आपल्या मनोगात म्हटले की, ब्रह्माकुमारीज् ही विश्वशांतीची भूमिका निभावते, ब्रह्माकुमारीज व पत्रकारिता यांच्या मैत्री आहे, आज जागतिक मैत्री दिवसानिमित्त अशा चर्चासत्रांचे आयोजन या दोघांमध्ये मैत्री दृढ करणारे आहे, ही समाधानाची बाब आहे.
समारोपपूर्वी राजयोगीनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदी, संचालिका, अकोला सेवाकेंद्र यांनी आशिर्वचन दिले तर बी.के. सुषमादीदी यांनी राजयोग अभ्यासाचे मार्गदर्शन केले. सहभागी मीडिया प्रतिनिधी म्हणून खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले, प्रेस क्लब खामगाव अध्यक्ष प्रशांत देशमुख,
पत्रकार गजानन राऊत, पत्रकार सूर्यवंशी, पत्रकार धनंजय वाजपे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी सुषमादीदी यांनी केले. आभार प्रा. गोपाल राखोंडे यांनी मानले. समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला. प्रसंगी बुलढाणा जिल्हयातून मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी सुषमादीदी यांनी केले. आभार प्रा. गोपाल राखोंडे यांनी मानले. समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला. प्रसंगी बुलढाणा जिल्हयातून मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला
————————————————————————————————————————–
Hindi News
“तकनीक के साथ आत्मज्ञान हो तो डिजिटल युग में मूल्यनिष्ठ पत्रकारिता संभव”
मीडिया चर्चासत्र में विशेषज्ञों की राय
खामगांव (3 अगस्त): डिजिटल तकनीक ने पत्रकारिता का स्वरूप तेज़ी से बदल दिया है। इन बदलावों की समीक्षा करते समय पत्रकारों के लिए आवश्यक है कि वे मूल्यों, ज़िम्मेदारी और मानवीय दृष्टिकोण को बनाए रखें। यह विचार आज खामगांव में आयोजित जिलास्तरीय मीडिया सम्मेलन में व्यक्त किए गए। सम्मेलन का विषय था “डिजिटल तकनीक: चुनौतियां, अवसर और पत्रकारिता की नई दिशा”। यह कार्यक्रम ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माउंट आबू की ओर से रायगड कॉलोनी स्थित ब्रह्माकुमारीज शिवालय सेवा केंद्र में आयोजित किया गया।
कार्यक्रम की शुरुआत प्रभु स्मृति और स्वागत नृत्य “ये आंगन ये द्वारे” से हुई। ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी ने स्वागत भाषण दिया।
मुख्य प्रस्तावना ब्रह्माकुमार डॉ. शांतनुभाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग ने की। उन्होंने कहा कि “समस्या बताने से समाधान नहीं होता, समाधान-प्रधान पत्रकारिता ज़रूरी है। गांधीजी ने कहा था कि पत्रकारिता सेवा है। पुलिस प्रशासन के बिना कुछ दिन चल सकता है, लेकिन समाचार पत्र के बिना एक दिन भी संभव नहीं।” उन्होंने ब्रह्माकुमारीज मीडिया विंग द्वारा आयोजित मूल्यनिष्ठ कार्यक्रमों की जानकारी दी।
बीज भाषण में दैनिक देशोन्नती (बुलढाणा संस्करण) के संपादक श्री राजेश राजोरे ने कहा: “डिजिटल युग में तेज़ गति से समाचार देने के साथ सटीकता और ज़िम्मेदारी बनाए रखना सबसे बड़ी चुनौती है। तकनीक के साथ आत्मपरीक्षण और नैतिकता भी ज़रूरी है।”
उद्घाटन भाषण श्री रणजीतसिंह राजपूत, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, बुलढाणा जिला ने किया। उन्होंने कहा कि पत्रकारिता का कार्य समाज को दिशा देना और अभिव्यक्ति की स्वतंत्रता की रक्षा करना है। उन्होंने कहा कि सच्ची पत्रकारिता करने वालों की रक्षा होनी चाहिए।
अन्य विचार:
श्री अरुणजी जैन (वरिष्ठ उपसंपादक, दैनिक सकाळ) ने कहा कि ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग इस तरह की चर्चाओं से वैचारिक क्रांति ला रहा है।
श्री अनिल गवई (उपसंपादक, लोकमत) ने कहा कि ऐसे सत्रों से चुनौतियों का सामना करने की प्रेरणा मिलती है।
श्री संदीप वानखेडे (पुढारी न्यूज) ने कहा कि ब्रेकिंग न्यूज की होड़ में सकारात्मक पत्रकारिता लुप्त हो रही है, इसे बचाना होगा।
श्री राजेंद्र काळे (जिला प्रतिनिधि, देशोन्नती) ने कहा कि ब्रह्माकुमारीज और पत्रकारिता में दोस्ती है, आज विश्व मैत्री दिवस पर यह आयोजन महत्वपूर्ण है।
समापन सत्र में ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदी (संचालिका, अकोला सेवा केंद्र) ने आशीर्वचन दिए। बी.के. सुषमादीदी ने राजयोग का मार्गदर्शन कराया। अंत में प्रश्नोत्तर सत्र, पत्रकारों के विचार और धन्यवाद प्रस्ताव (प्रा. गोपाल राखोंडे) हुआ। कार्यक्रम का संचालन बी.के. सुषमादीदी ने किया।
कार्यक्रम में बुलढाणा जिले से बड़ी संख्या में मीडिया प्रतिनिधियों ने सहभागिता दर्ज की।



















अधिक माहितीसाठी :
🌐 www.mediawing.org | www.BkMahaMedia.com/bkkhamgaon
📞 संपर्क : ९८२२५ ९३९०३
📩 ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, खामगाव






