पत्रकारांनी सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक -ब्र.कु. डॉ शांतनुभाई
माध्यमे चुकीच्या लोकांच्या ताब्यात गेल्यास विपरीत परिणाम भोगावे लागतात- – वरिष्ठ पत्रकार शांतनु डोईफोडे
नांदेड दिनांक 18 जून
सामाजिक पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारांनी योग व ध्यानधारणा यांच्या माध्यमातून सकारात्मक जीवनशैली अंगीकारली पाहिजे असे मत माऊंट आबू येथील ब्रह्माकुमारी मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्र. कु. डॉ शांतनुभाई यांनी व्यक्त केले. नांदेड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, वसंतनगर यांच्या वतीने आयोजित शांतता, एकता आणि परस्पर विश्वास दृढ करण्यात माध्यमांची भूमिका या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, माउंट आबू येथील दत्तात्रयभाई, वसंतनगर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी स्वाती दिदी, प्रसिद्ध छायाचित्रकार विजय होकर्णे, प्रकाश कांबळे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविक स्वागत संबोधनात बी के स्वातीदिदी म्हणाल्या, ” पत्रकार हा स्वतः तणावाखाली पत्रकारितेचे काम करत असतो. तणावमुक्त होण्यासाठी पत्रकारांनी अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले पाहिजे.
“यावेळी बोलताना संतोष पांडागळे म्हणाले, “आजच्या काळामध्ये जीवन जगताना अशांतता निर्माण होत आहे. आपले जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य होत चालले आहे. सातत्याने नकारात्मक बातम्या पत्रकारांना इच्छा नसतानाही छापाव्या लागतात. “शंतनू डोईफोडे आपल्या भाषणात म्हणाले,” मीडियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीचे व संवेदनशीलतेचे भान असेल तर, जगातील अर्धे प्रश्न कमी होऊ शकतात.
माध्यमातून आपण मध्यस्थतेकडे वळत चाललो आहोत. तेंव्हा मध्यस्थ करणारा व्यक्ती विश्वासार्ह असेल तर प्रश्न सुटू शकतात. सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांवर बेजबाबदारीने लिखाण करण्याची वृत्ती कारणीभूत आहे. माध्यमे चुकीच्या लोकांच्या ताब्यात असतील तर त्याचे विपरीत परिणाम समाजावर व राष्ट्रावर होतात, हे वेगवेगळ्या घटनांवरून अधोरेखित होत आहे.
आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये ब्र.कु. डॉ शांतनुभाई म्हणाले, “प्रामाणिक पत्रकारिता सत्तेसमोर व अन्याय करणाऱ्यांसमोर कधीही झुकू शकत नाही. पत्रकारांनी वंचित, शोषित व कष्टकरी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारिता केली पाहिजे. महाराष्ट्रातील सामाजिक पत्रकारितेने भारतामध्ये आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांनी भाषणामध्ये विशेष कौतुक केले. तसेच माऊंट आबू येथे होणाऱ्या पत्रकारांच्या संमेलनामध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले.
परिसंवादातील सहभागी वक्ते व पत्रकारांचे आभार मानताना विजय होकर्णे यांनी हा परिसंवाद एका प्रकारे सांगता नसून एक नव्या चिंतनाची सुरुवात आहे असे सांगुन नांदेड येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्र, वसंतनगर नांदेड यांनी एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणली याबद्दल अभिनंदन केले. पत्रकारांनी एकत्र येऊन माध्यमांची सकारात्मक दिशा अधिक सशक्त करण्याचा संकल्प आज करावा आणि माध्यमांची शक्ती ही शस्त्र शक्ती नसुन संस्कार आहे अशी भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन .ब्र. कु. पूजा बहेन यांनी केले. कार्यक्रमात ब्रह्मकुमारी सेवा केंद्र वसंतनगर यांच्यावतीने नांदेड जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व समाजमाध्यमाचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या नूतन कार्यकारणीच्या सदस्यांचा व उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
——————————————————————————————————————————
Hindi News
पत्रकारों को सकारात्मक जीवनशैली अपनाना आवश्यक – ब्र.कु. डॉ. शांतनुभाई
मीडिया गलत लोगों के हाथों में जाए तो समाज पर विपरीत प्रभाव पड़ता है – वरिष्ठ पत्रकार शांतनु डोईफोडे
नांदेड, 18 जून: सामाजिक पत्रकारिता के लिए पत्रकारों को योग और ध्यान के माध्यम से सकारात्मक जीवनशैली अपनानी चाहिए, ऐसा विचार माउंट आबू स्थित ब्रह्माकुमारी मीडिया विभाग के राष्ट्रीय समन्वयक ब्र.कु. डॉ. शांतनुभाई ने व्यक्त किया। वे नांदेड के ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, वसंतनगर द्वारा आयोजित “शांति, एकता और आपसी विश्वास मजबूत करने में मीडिया की भूमिका” विषयक परिसंवाद कार्यक्रम में बोल रहे थे।
कार्यक्रम की अध्यक्षता प्रजावाणी के संपादक शांतनु डोईफोडे ने की। इस अवसर पर मराठी पत्रकार परिषद के नवनिर्वाचित जिलाध्यक्ष संतोष पांडागळे, माउंट आबू के दत्तात्रय भाई, वसंतनगर केंद्र की संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी स्वाती दीदी, वरिष्ठ छायाकार विजय होकर्णे और प्रकाश कांबळे मंचासीन थे।
अपने स्वागत भाषण में बी.के. स्वाती दीदी ने कहा, “पत्रकार स्वयं तनावग्रस्त रहते हुए भी काम करता है। तनावमुक्त होने के लिए पत्रकारों को आध्यात्मिकता की ओर मुड़ना चाहिए।”
संतोष पांडागळे ने कहा, “आज के समय में जीवन जीते हुए अशांति बढ़ रही है। जीवन सहज होने की बजाय कठिन होता जा रहा है। पत्रकारों को उनकी इच्छा के विरुद्ध नकारात्मक समाचार छापने पड़ते हैं।”
शांतनु डोईफोडे ने कहा, “यदि मीडिया में कार्यरत लोगों में जिम्मेदारी और संवेदनशीलता का भाव हो तो दुनिया की आधी समस्याएँ कम हो सकती हैं। मीडिया मध्यस्थता की ओर बढ़ रहा है और यदि मध्यस्थ विश्वसनीय हो तो समस्याएँ सुलझ सकती हैं। लेकिन यदि मीडिया गलत लोगों के कब्ज़े में हो तो उसके दुष्परिणाम समाज और राष्ट्र को भुगतने पड़ते हैं।”
अपने मार्गदर्शनपरक भाषण में ब्र.कु. डॉ. शांतनुभाई ने कहा, “ईमानदार पत्रकारिता सत्ता या अन्याय के आगे कभी नहीं झुक सकती। पत्रकारों को वंचितों, शोषितों और किसानों पर होने वाले अन्याय को उजागर करने के लिए पत्रकारिता करनी चाहिए।” महाराष्ट्र की सामाजिक पत्रकारिता ने भारत में आदर्श स्थापित किया है, ऐसा उन्होंने विशेष रूप से कहा। साथ ही उन्होंने नांदेड जिले के पत्रकारों से माउंट आबू में होने वाले पत्रकार सम्मेलन में बड़ी संख्या में उपस्थित होने का आवाहन किया।
आभार व्यक्त करते हुए विजय होकर्णे ने कहा, “यह परिसंवाद समापन नहीं, बल्कि नए चिंतन की शुरुआत है। नांदेड सेवा केंद्र ने इतने महत्वपूर्ण विषय पर चर्चा का अवसर उपलब्ध कराया, यह सराहनीय है। पत्रकारों को एकजुट होकर मीडिया की सकारात्मक दिशा को और सशक्त बनाने का संकल्प करना चाहिए। मीडिया की शक्ति हथियार नहीं, बल्कि संस्कार है।”
कार्यक्रम का सुंदर संचालन ब्र.कु. पूजा बहन ने किया। इस अवसर पर ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, वसंतनगर नांदेड की ओर से वरिष्ठ पत्रकारों, छायाकारों, इलेक्ट्रॉनिक मीडिया और सोशल मीडिया प्रतिनिधियों, मराठी पत्रकार परिषद की नवनिर्वाचित कार्यकारिणी के सदस्यों तथा उपस्थित पत्रकारों का सत्कार किया गया।

















