पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूनस्र्थापना
ब्रह्माकुमारीज् मीडिया विंगतर्फे अहिल्यानगर जिल्हास्तर मीडिया संमेलन संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी) पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची व्यवस्था नसून समाज प्रबोधन, मूल्य रक्षण करणारी शक्ती आहे, पेन पासून पेनलेस पर्यंतच्या माध्यमांच्या प्रवाहात शाश्वत मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी माध्यम क्षेत्रातील सर्वांवर असल्याचे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यायलयाच्या अहिल्यानगर येथील सेवाकेंद्रात आयोजित ब्रह्माकुमारीज् मीडिया विंगतर्फे अहिल्यानगर जिल्हास्तर मीडिया संमेलन आयोजित करण्यात आले. त्यात डॉ. वडनेरे यांनी आपल्या बीज भाषणात पुढे म्हटले की, माध्यमांनी सत्यता, नि:पक्षता आणि मानवी संवेदना यांची जाणीव ठेवून केलेले वार्तांकन मूल्यनिष्ठ पत्रकारितेस मदत करतील.
विषय प्रास्ताविकात ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी जगात प्रत्येक क्षेत्रात मूल्यांच्या ·हासाविषयी चिंता व्यक्त करतांना सांगितले की पत्रकारितेद्वारा मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या प्रसंगी त्यांनी पत्रकारितेतील विविध प्रवाहांचा आणि ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाद्वारे होत असलेल्या मूल्यनिष्ठ आाणि सकारात्मक पत्रकारितेच्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला
श्री. विट्ठल लांडगे, अध्यक्ष, अहिल्यानगर प्रेस क्लब, संपादक दै. लोकआवाज यांनी बातमीच्या विश्वासाहर्तेविषयी वास्तववादी लेखन करण्याविषयी स्पष्ट केले.
उद्घाटकीय संबोधन करतांना श्री. सुरेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अहिल्यानगर यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर पत्रकारितेचा आढावा घेतला.
श्री. सुधीर लंके, अध्यक्ष, अधिस्विकृती समिती, नाशिक विभाग तथा निवासी संपादक दै. लोकमत, अ.नगर यांनी कृतिम बुद्धीमत्तेच्या माध्यम क्षेत्रात विवेकाने वापर केल्यास निश्चित पत्रकारिता गतिमान होते यावर आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. विजयसिंह होलम, सदस्य,अधिस्विकृती समिती, नाशिक विभाग ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग मार्फत होत असलेल्या प्रयत्नाची प्रशंसा करतांना म्हटले की, मूल्यनिष्ठ पत्रकारिता ही संकल्पना आपण सगळीकडे पोहचावी हेच या कार्यशाळेचे फलित ठरेल.
श्री. सुरेश पठारे, संचालक, सी.एस.आर.डी. जर्नालिझम महाविद्यालय, अ. नगर यांनी कृतिम बुद्धीमत्तेवर माणसाचा मेंदू निश्चित वरचढ ठरणार असा आशावाद व्यक्त केला.
कु. आरुषी, अहिल्यानगर हीने स्वर्णीम संस्कृती लाएगे हे प्रेरक नृत्य सादर केले.
श्री. भुषण देशमुख, ज्येष्ठ पत्रकार, अहिल्यानगर यांनी माऊंट आबू येथील आपला अनुभव सांगितला. श्री. संतोष पवार, उद्योगपती, समाजसेवक, अहिल्यानगर यांनी समाजातील दरी कमी करण्याचे काम पत्रकारीतेद्वारे व्हावे असे म्हटले.
श्री. रामदास ढमाले, ज्येष्ठ पत्रकार यांनी नगर जिल्ह्याच्या पत्रकारितेचा आढावा घेतला. पुणे जिल्हा मीडिया समन्वयक बीके सोमनाथ म्हस्के यांनीही समायोचित विचार व्यक्त केलेत
श्री. रामभाऊ जोशी, संपादक नगर टाईम्स यांनी पत्रकारांनी संवेदनशिलता जपण्याविषयी स्पष्ट केले.
श्री. गौतम कु ळकर्णी, मुक्त पत्रकार यांनी मोबाईल जर्नालिझम आणि मूल्य या विषयी आपले मत व्यक्त केले.
श्री.द अशोक सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार यांनी सत्य आणि निपक्षपातीपणे वृत्तांकन करण्याची जबाबदारी विषयी स्पष्ट केले.
याप्रसंगी ब्र.कु. डॉ. दिपक हरके, ध्यानधारणा प्रशिक्षक, अहिल्यानगर यांनी बी.के.डॉ. शांतनुभाई यांना ग्लोबल बुक ऑफ इक्सलेन्स, इंग्लड यांचे तर्फे सर्टिफिकेट ऑफ हॉनर देऊन सन्मानीत केले.
सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी आशिर्वचन – राजयोगीनी ब्रह्माकुमारी राजेश्वरीदीदीजी, संचालिका, अहिल्यानगर सेवाकेंद्र यांनी केले. राजयोग अभ्यास – बी.के. उज्वलादीदी, राजयोगी शिक्षिका, अहिल्यानगर यांनी करविला.
आभार प्रदर्शन – ब्र.कु. निर्मलादीदीजी राजयोगी शिक्षिका, अहिल्यानगर यांनी तर सूत्रसंचलन : ब्रह्माकुमारी सुवर्णादीदी, राजयोग शिक्षिका, अहिल्यानगर यांनी केले.
प्रभू स्मृतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. स्वामीनी शिंदे आणि कुमारी प्रियल उपाध्याय यांनी शिवस्तृती नृत्य सादर केले. स्वागत संबोधन – ब्रह्माकुमारी सुप्रभादीदी, राजयोग शिक्षिका, अहिल्यानगर सेवाकेंद्र यांनी केले.
——————————————————————–
Hindi News
ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग द्वारा अहिल्यानगर (अहमदनगर) जिलास्तरीय मीडिया सम्मेलन सम्पन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधि) पत्रकारिता केवल समाचार प्रदान करने की व्यवस्था नहीं है, बल्कि सामाजिक प्रबोधन और मूल्यों की रक्षा का एक माध्यम है। मीडिया विंग के महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे ने इस बात पर ज़ोर दिया कि कलम से लेकर कलम-रहित मीडिया के प्रवाह में शाश्वत मूल्यों की रक्षा करना मीडिया क्षेत्र के सभी लोगों का दायित्व है।
ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग द्वारा अहिल्यानगर जिलास्तरीय मीडिया सम्मेलन का आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय के अहिल्यानगर स्थित सेवा केंद्र में किया गया। अपने मुख्य भाषण में डॉ. सोमनाथ वडनेरे ने आगे कहा कि मीडिया द्वारा सत्य, निष्पक्षता और मानवीय संवेदना के प्रति सजगता के साथ की गई रिपोर्टिंग मूल्य-आधारित पत्रकारिता में सहायक होगी।
प्रस्तावना में, माउंट आबू स्थित मीडिया प्रभाग के राष्ट्रीय समन्वयक ब्रह्माकुमार डॉ. शांतनुभाईजी ने विश्व के प्रत्येक क्षेत्र में मूल्यों के ह्रास पर चिंता व्यक्त की और कहा कि पत्रकारिता के माध्यम से मूल्यों की रक्षा करना हम सभी का दायित्व है।
उद्घाटन भाषण में, अहिल्यानगर के जिला सूचना अधिकारी श्री सुरेश पाटिल ने स्वतंत्रता-पूर्व और स्वतंत्रता-उत्तर पत्रकारिता की समीक्षा की। नासिक प्रभाग की मान्यता समिति के अध्यक्ष श्री सुधीर लंके और दैनिक लोकमत के स्थानीय संपादकने अपने विचार व्यक्त किए कि यदि मीडिया क्षेत्र में कृत्रिम बुद्धिमत्ता का बुद्धिमानी से उपयोग किया जाए, तो पत्रकारिता निश्चित रूप से गतिशील होगी।
अहिल्यानगर प्रेस क्लब के अध्यक्ष एवं दैनिक लोक आवाज़ के संपादक श्री विट्ठल लांडगे ने समाचारों की विश्वसनीयता के बारे में यथार्थवादी लेखन के बारे में बताया।
नासिक संभाग की मान्यता समिति के सदस्य श्री विजयसिंह होलम ने ब्रह्माकुमारीज़ मीडिया विंग के माध्यम से किए जा रहे प्रयासों की सराहना करते हुए कहा कि इस कार्यशाला का परिणाम यह होगा कि हम मूल्य-आधारित पत्रकारिता की अवधारणा को सर्वत्र पहुँचाएँ।
सी.एस.आर.डी. पत्रकारिता महाविद्यालय, आ. नगर के निदेशक श्री सुरेश पठारे ने आशा व्यक्त की कि मानव मस्तिष्क निश्चित रूप से कृत्रिम बुद्धिमत्ता पर विजय प्राप्त करेगा। सुश्री आरुषि, अहिल्यानगर ने ‘स्वर्णिम संस्कृति लागे’ शीर्षक से एक प्रेरक नृत्य प्रस्तुत किया।
वरिष्ठ पत्रकार, अहिल्यानगर श्री भूषण देशमुख ने माउंट आबू में अपने अनुभव साझा किए। उद्योगपति एवं समाजसेवी, अहिल्यानगर श्री संतोष पवार ने कहा कि पत्रकारिता के माध्यम से समाज में व्याप्त दूरियों को कम करने का कार्य किया जाना चाहिए। वरिष्ठ पत्रकार श्री रामदास धामले ने नगर जिले की पत्रकारिता की समीक्षा की। पुणे जिल्हा मीडिया समन्वयक बीके सोमनाथ म्हस्केने भी अपने अनुभवयुक्त विचार व्यक्त किए.
श्री रामभाऊ जोशी, संपादक, नगर टाइम्स ने पत्रकारों द्वारा संवेदनशीलता बनाए रखने के बारे में बताया। स्वतंत्र पत्रकार श्री गौतम कुलकर्णी ने मोबाइल पत्रकारिता और मूल्यों पर अपने विचार व्यक्त किए। वरिष्ठ पत्रकार श्री डी. अशोक सोनावणे ने सच्चाई और निष्पक्षता से रिपोर्टिंग करने की जिम्मेदारी के बारे में बताया।
इस अवसर पर ब्र.के. अहिल्यानगर के ध्यान प्रशिक्षक डॉ. दीपक हरके ने बी.के. को सम्मानित किया। डॉ. शांतनुभाई को ग्लोबल बुक ऑफ एक्सीलेंस, इंग्लैंड से सम्मान प्रमाण पत्र प्रदान किया ।
कार्यक्रम की शुरुआत प्रभु स्मृति से हुई। कुमारी स्वामीनी शिंदे और कुमारी प्रियल उपाध्याय ने शिवस्तुती नृत्य प्रस्तुत किया। स्वागत भाषण अहिल्यानगर सेवाकेंद्र की राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी सुप्रभादीदी ने दिया। सभी मीडिया प्रतिनिधियों को आशीर्वाद – राजयोगिनी ब्रह्माकुमारी राजेश्वरी दीदीजी, संचालिका, अहिल्यानगर सेवाकेंद्र। राजयोग अभ्यास – बी.के. उज्वलादीदी, राजयोगी शिक्षिका, अहिल्यानगर। धन्यवाद ज्ञापन – ब्र.के. निर्मलादीदीजी राजयोग शिक्षिका, अहिल्यानगर और संचालन ब्रह्माकुमारी सुवर्णदीदी, राजयोग शिक्षिका, अहिल्यानगर ने किया।
* * * *












पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूनस्र्थापना
रविवार दि. 20 जुलै, 2025, सकाळी 10 वाजता
समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत. `पेन` पत्रकारितेपासून `पेनलेस` पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पूनस्र्थापित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या विचार मंथनासाठी अहिल्यानगर जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे करण्यात आले आहे. या संमेलनासाठी मधूबन पावून भूमी माऊंट आबू (राजस्थान)चे ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, मीडिया प्रभाग राष्ट्रीय समन्वयक, आणि जळगावचे प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
- * दिनांक : रविवार दि. 20 जुलै, 2025, वेळ : सकाळी 10 ते 12 (तदनंतर सर्वांसाठी ब्रह्माभोजन)
* स्थान : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयशिवदर्शन भवन,63/40 महावीर नगर, शेवडी रोड, अहिल्यानगर-414001
* संपर्क : 7276430213
ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी
संचालिका, अहिल्यानगर सेवाकेंद्र
(संमेलनासाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही तथापि, नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी स्थानिय ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात संपर्क साधावा.)
अधिक माहितीसाठी: www.mediawing.org | www.BkMahaMedia.com\Ahilyanagar
या संमेलनासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर/सोशल मीडिया, मीडिया शिक्षण संस्था, जनसंपर्क, जाहिरात आदि सर्व मीडिया प्रतिनिधी होणार आहेत. आपण माध्यमक्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक आहात. आपणही या विचार मंथनात सहभागी व्हावे.आणि या संमेलनासाठी आपली उपस्थिती नोंदवावी ही सस्नेह विनंती.
माऊंट आबू येथील विविध नैसर्गीक आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळांचाी माहितसाठी abu_darshan माऊंट आबू दर्शन – BK Maha Media
Move upMove downToggle panel: Yoast SEOMove upMove downToggle panel: Taqyeem – Review Options
Review Box Position Disable Top of the post Bottom of the post Custom position Open save panel
- Post
- Paragraph



