BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

Akola

Akola

*डिजिटल पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानाचा विवेकी आणि प्रभावी उपयोगातील संतूलन आवश्यक*

*- ब्रह्माकुमारीज् आयोजित अकोला जिल्हास्तरीय मीडिया संमेलनात माध्यम तज्ज्ञांचा आशावाद*

पत्रकारितेतील बदलते तंत्रज्ञान : संधी, आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर विचार मंथन

अकोला (दि.   ) डिजिटल पत्रकारिता करतांना तंत्रज्ञानात होत असलेली स्थित्यंतरे अपरिहार्य असून बदलत्या प्रवाहात तंत्रज्ञानाचा विवेक आणि प्रभावी उपयोग केल्यास शाश्वत मूल्यांना धरुन पत्रकारिता केली जाऊ शकते असा आशावाद ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग, अकोला आयोजित जिल्हास्तर मीडिया संमेलनातील वक्त्यांनी केला.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे अकोला सेवाकेंद्र आणि माऊंट आबू येथील मीडिया प्रभागामार्फत पत्रकारितेतील बदलते तंत्रज्ञान : संधी, आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन केले गेले. कु. जोया, कु. मनिषा, अकोला यांनी स्वागत नृत्य सादर केले. स्वागत संबोधन  ब्रह्माकुमारी अर्चनादीदी, राजयोग शिक्षिका, अकोला सेवाकेंद्र यांनी केले.  

विषय प्रास्ताविक करतांना ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू  यांनी म्हटले की, जगात सर्व क्षेत्रात नैतीक मूल्यामध्यें होत असलेली घसरण पाहता ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी भरीव कार्य केले आहे. चुकीच्या बातम्या क्षणात सर्वदूर पसरता मात्र सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोहचत नाही याबद्दल चिंता व्यक्त करतांना त्यांनी सायबर युगातील पत्रकारितेची जबाबदारी वाढल्याचे स्पष्ट केले. ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे माध्यमक्षेत्रासाठी होत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा त्यांनी या प्रसंगी आढावा घेतला.

 डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगाव यांनी बीज भाषणात नवीन तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. बदलत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधी त्यामुळे आलेली आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारीते संदर्भातील विविध पैलू त्यांनी उपस्थित केले. 

  तत्पूर्वी जिल्हा जिल्हास्तरीय संमेलनाचे उदघाटन दिप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.  उद्घाटकीय संबोधन करतांना  श्री. हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला यांनी कृतीम बुद्धीमत्तेद्वारे पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील होत असलेल्या बदलांचा आढावा घेतांना म्हटले की कृतिम बुद्धीमत्ता पत्रकारितेची जागा घेऊ शकत नाही. 

दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून पत्रकारीतेची ओळख करुन देतांना स्वातंत्रपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये होत असलेल्या बदलांचा आढावा घेतांना म्हटले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणे म्हणजे मूल्यनिष्ठ पत्रकारिता करणे होय. 

त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगते व्यक्त केलीत. डॉ. रामप्रकश वर्मा, संस्थापक, राष्ट्र भाषा सेवा समाज, अकोला यांनी कलम आणि मशाल यांची तुलना पत्रकारितेसंदर्भात केली.   श्री. राजेश राजोरे, संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा आवृत्ती, खामगाव यांनी त्याग, सेवा आणि समर्पण या मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या त्रिसूत्री सांगितल्यात. श्री. सुरज गोळे, प्रसारण अधिकारी, आकाशवाणी, अकोला यांनी आकशवाणीद्वारे होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमाचा आढावा घेतला.डॉ. हमेश बाबू नानवाला,प्राध्यापक डॉ. बाबासाहेब पत्रकारिता महाविद्यालय,अकोला यांनी तंत्रज्ञान जरी विकसीत झाले तरी मानवी पत्रकारितेला पर्याय नसल्याचे म्हटले. श्री. श्याम पन्नालालजी शर्मा, संपादक व प्रकाशक, जमाना साप्ताहिक,अकोला यांनी माऊंट येथील मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या प्रयत्नांचा आढावा घेतला. श्री. डॉ.प्रमोद कुमार शुक्ल, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, अकोला यांनी न्यूज आणि व्हयूज याबद्दल स्पष्ट केले.  

         राजयोगीनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदीजी, संचालिका, अकोला सेवाकेंद्र यांनी उपस्थितांना माऊंट आबू येथे मीडिया विंग मार्फत होण्या·या संमेलनासाठी निमंत्रण देऊन आशीर्वचन दिलेत. राजयोग अभ्यास – बी.के. वर्षादीदी, राजयोगी शिक्षिका, गांधी रोड, अकोला यांनी उपस्थितांना करवून दिला. सहभागी मीडिया प्रतिनिधींचे मनागते/प्रश्नोत्तरे झालीत.  आभार प्रदर्शन  अॅड सारीका तिवारी  तर सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी वर्षादीदी यांनी केले.

————————————————————————————————————————————–

Hindi News

डिजिटल पत्रकारिता करते समय तकनीक का विवेकपूर्ण और प्रभावी उपयोग आवश्यक
ब्रह्माकुमारीज आयोजित अकोला जिला स्तरीय मीडिया सम्मेलन में मीडिया विशेषज्ञों की अभिव्यक्ति

पत्रकारिता में बदलती तकनीक : अवसर, चुनौतियाँ और मूल्यनिष्ठ पत्रकारिता पर चिंतन

अकोला (दि. …): डिजिटल पत्रकारिता में तकनीक में हो रहे बदलाव अपरिहार्य हैं। बदलते प्रवाह में यदि तकनीक का विवेकपूर्ण और प्रभावी उपयोग किया जाए तो शाश्वत मूल्यों के आधार पर पत्रकारिता की जा सकती है, ऐसा आशावाद अकोला में ब्रह्माकुमारीज मीडिया विंग द्वारा आयोजित जिला स्तरीय मीडिया सम्मेलन में वक्ताओं ने व्यक्त किया।

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अकोला सेवा केंद्र और माउंट आबू के मीडिया प्रभाग के संयुक्त तत्वावधान में पत्रकारिता में बदलती तकनीक : अवसर, चुनौतियाँ और मूल्यनिष्ठ पत्रकारिता” विषय पर यह सम्मेलन हुआ। कार्यक्रम की शुरुआत स्वागत नृत्य (कु. जोया, कु. मनिषा, अकोला) से हुई। स्वागत भाषण ब्रह्माकुमारी अर्चना दीदी (राजयोग शिक्षिका, अकोला सेवाकेंद्र) ने किया।

प्रास्ताविक भाषण में ब्रह्माकुमार डॉ. शांतनुभाई (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माउंट आबू) ने कहा कि आज पूरे विश्व में नैतिक मूल्यों का पतन दिखाई दे रहा है। ऐसे समय में ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग ने मूल्यनिष्ठ समाज निर्माण के लिए महत्त्वपूर्ण कार्य किया है। गलत समाचार क्षणभर में फैल जाते हैं, परंतु सकारात्मक समाचार लोगों तक नहीं पहुँचते — इस चिंता को व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि साइबर युग में पत्रकारिता की जिम्मेदारी और अधिक बढ़ गई है।

डॉ. सोमनाथ वडनेरे (महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, जळगांव) ने अपने बीज भाषण में नए तकनीकी बदलावों से पत्रकारिता और मीडिया क्षेत्र में आए अवसरों, चुनौतियों और मूल्यनिष्ठ पत्रकारिता के विभिन्न पहलुओं पर प्रकाश डाला।

संमेलन का उद्घाटन दीप प्रज्वलन से हुआ। उद्घाटन भाषण में श्री हर्षवर्धन पवार (जिला सूचना अधिकारी, अकोला) ने कहा कि कृत्रिम बुद्धिमत्ता से पत्रकारिता और मीडिया क्षेत्र में बदलाव आ रहे हैं, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता पत्रकारिता का स्थान नहीं ले सकती।

दैनिक देशोन्नती के संपादक प्रकाश पोहरे ने लोकतंत्र के चौथे स्तंभ के रूप में पत्रकारिता की भूमिका बताते हुए स्वतंत्रता पूर्व और स्वतंत्रता पश्चात पत्रकारिता में आए परिवर्तनों का आढावा लिया। उन्होंने कहा कि आम जनता की समस्याओं को सामने लाना ही मूल्यनिष्ठ पत्रकारिता है।

इसके बाद विभिन्न मान्यवरों ने अपने विचार रखे —

  • डॉ. रामप्रकाश वर्मा (संस्थापक, राष्ट्र भाषा सेवा समाज, अकोला) ने पत्रकारिता की तुलना कलम और मशाल से की।
  • श्री राजेश राजोरे (संपादक, देशोन्नती, बुलढाणा आवृत्ती, खामगांव) ने त्याग, सेवा और समर्पण को मूल्यनिष्ठ पत्रकारिता की त्रिसूत्री बताया।
  • श्री सुरज गोळे (प्रसारण अधिकारी, आकाशवाणी, अकोला) ने आकाशवाणी के माध्यम से होने वाले मूल्यनिष्ठ कार्यक्रमों की जानकारी दी।
  • डॉ. हमेश बाबू नानवाला (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब पत्रकारिता महाविद्यालय, अकोला) ने कहा कि तकनीक चाहे कितनी भी उन्नत हो जाए, मानवीय पत्रकारिता का कोई विकल्प नहीं।
  • श्री श्याम पन्नालालजी शर्मा (संपादक व प्रकाशक, जमाना साप्ताहिक, अकोला) ने माउंट आबू से मूल्यनिष्ठ समाज निर्माण के लिए हो रहे प्रयासों का उल्लेख किया।
  • डॉ. प्रमोद कुमार शुक्ल (महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, अकोला) ने “न्यूज़” और “व्यूज़” के अंतर को स्पष्ट किया।

अंत में राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी दीदी (संचालिका, अकोला सेवाकेंद्र) ने उपस्थितों को माउंट आबू में आयोजित होने वाले आगामी मीडिया सम्मेलन के लिए आमंत्रित किया और आशीर्वचन दिए। राजयोग अभ्यास ब्रह्माकुमारी वर्षा दीदी ने करवाया। मीडिया प्रतिनिधियों के प्रश्नोत्तर सत्र के बाद आभार प्रदर्शन अधिवक्ता सारीका तिवारी ने किया और संचालन ब्रह्माकुमारी वर्षा दीदी ने किया।

अधिक माहितीसाठी संपर्क :
🌐 www.mediawing.org | www.BkMahaMedia.com/bkakola
📞 संपर्क : ९८२२५ ९३९०३
📩 ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, अकोला

Tags

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media