बुलढाणा जिल्हास्तर मीडिया चर्चासत्र
“डिजिटल तंत्रज्ञान : संधी, आव्हाने आणि पत्रकारितेची नवी दिशा”
यावर होणार सखोल विचारमंथन
खामगाव | प्रतिनिधी
डिजिटल युगात झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमांच्या जगतात मूल्यनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर “डिजिटल तंत्रज्ञान : संधी, आव्हाने आणि पत्रकारितेची नवी दिशा” या विषयावर आधारित बुलढाणा जिल्हास्तर मीडिया चर्चासत्राचे आयोजन रविवार, दि. ०३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात आले आहे. हे चर्चासत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ‘शिवालय’, रायगड कॉलनी, घाटापूरी रोड, खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे.
या चर्चासत्राचे आयोजन मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षा आणि शोध प्रतिष्ठान (RE & RF), ब्रह्माकुमारीज माऊंट आबू आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :
माध्यमांना समाजाचे दर्पण मानले जाते. मात्र ‘पेन’ पासून ‘पेनलेस’ पत्रकारितेकडे वाटचाल करताना अनेक मूल्यमापनांचे प्रश्न उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर माध्यमांतील मूल्यांची पुनर्स्थापना, नैतिक अधिष्ठान आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर सायबर पत्रकारितेच्या नव्या शक्यता, डिजिटल माध्यमांचे प्रभाव, आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या गरजा या मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा होणार आहे. माध्यमांच्या विश्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधताना नैतिक अधिष्ठान कसे टिकवावे, यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते म्हणून ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू), प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (महाराष्ट्र राज्य मीडिया समन्वयक, जळगाव), श्री. राजेश राजोरे (खामगाव, अकोला क्षेत्रीय मीडिया समन्वयक) तसेच स्थानिक ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधींना सहभाग घेता येईल. यासाठी कुठलेही नोंदणी शुल्क असणार नाही, मात्र सहभाग ई-प्रमाणपत्रासाठी नोंदणी आवश्यक आहे. https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. लिंक प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप नोंदणीसाठी संपर्क : ९८५०६९३७०५ हा आहे.
या चर्चासत्रात वृत्तपत्रे, प्रिंट मीडिया, टी.व्ही., रेडिओ, केबल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर व सोशल मीडिया, पत्रकारिता शिक्षण संस्था, जाहिरात व जनसंपर्क क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे ब्रह्माकुमारी शंकुतला दीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, खामगाव यांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी :
🌐 www.mediawing.org | www.BkMahaMedia.com/bkkhamgaon
📞 संपर्क : ९८२२५ ९३९०३
📩 ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी, संचालिका – ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र, खामगाव





