BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

Malakapur

Malakapur

सद्भाव, प्रेम व बंधुभाव वाढवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे- डॉ.शांतनु भाईजी

मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलन संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी) सकारात्मक पत्रकारिता आणि समाजामध्ये सद्भाव, प्रेम आणि बंधुभाव पत्रकारांचे वाढवण्यासाठी योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नॅशनल कोऑर्डिनेटर मीडिया माउंटअबू राजस्थानचे ब्र. कु. डॉ. शांतनु भाईजी यांनी केले.

मीडिया प्रभाग ब्रह्माकुमारीज, माउंट आबू व स्थानिक पत्रकार संघ मलकापूरच्या संयुक्त विद्यमाने आज ६ ऑगस्ट रोजी येथील प्रजापिता ब्रम्हपुरी ईश्वरीय विश्वविद्यालय, मलकापूर केंद्रामध्ये मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मलकापूर केंद्राच्या प्रमुख संचालिका ब्रह्मा कुमारी गितादीदी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल कोऑर्डिनेटर माउंटअबू येथील डॉ. शांतनू भाईजी तसेच विशेष उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, ओमप्रकाश चांडक, नटराज चांडक आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शनात डॉ. शांतनु भाईजी यांनी सकारात्मक पत्रकारिता आपल्या आणि समाजामध्ये सद्भाव, प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच

माऊंट आबू येथील मीडिया विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या महत्वाच्या उपक्रम व कार्यक्रमांविषयी माहिती दिली. तसेच आगामी काळात देशभरातील पत्रकार बांधवांसाठी माउंटअबू येथे २६ ते ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनात सामिल होण्याचे आवाहन केले त्यांनी केले. संमेलनाच्या सुरुवातीला परमेश्वराचे स्मरण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. ब्रह्मकुमारी अन्वी चांडक हिने स्वागत नृत्य सादर करत उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी पत्रकार विरसिंहदादा राजपूत, हरिभाऊ गोसावी गजानन ठोसर, प्रा. डॉ. नितीन भुजबळ, गौरव खरे, समाधान सुरवाडे, अजय टप, कैलास काळे, श्रावण पाटील, विनोद व्यवहारे, सुधाकर तायडे, विलास खर्चे, शेख जमील सह प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाचे संचलन ब्रह्मा कुमारी दिपालीदीदी, प्रास्ताविक ब्रह्माकुमारी अंकिता   तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी  पुष्पा दीदी यांनी केले. 

————————————————————————————————————————–

Hindi News

सद्भाव, प्रेम और बंधुभाव बढ़ाने में पत्रकारों का योगदान महत्वपूर्ण – बीके डॉ. शांतनु भाईजी

मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलन संपन्न

मलकापुर (प्रतिनिधि)।

“समाज में सकारात्मक बदलाव लाने के लिए पत्रकारों द्वारा किया जाने वाला कार्य अत्यंत महत्वपूर्ण है। सद्भाव, प्रेम और बंधुभाव की भावना को मजबूत करने में मीडिया की बड़ी भूमिका है,” ऐसा प्रतिपादन डॉ. शांतनु भाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माउंट आबू (राजस्थान) ने किया।

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मलकापुर केंद्र में दिनांक 6 अगस्त को “मूल्यनिष्ठ पत्रकारिता संमेलन” का आयोजन किया गया। यह आयोजन ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माउंट आबू और स्थानीय पत्रकार संघ, मलकापुर के संयुक्त तत्वावधान में संपन्न हुआ।

कार्यक्रम की अध्यक्षता मलकापुर केंद्र की संचालिका ब्रह्माकुमारी गीता दीदी ने की। मुख्य मार्गदर्शक के रूप में डॉ. शांतनु भाईजी उपस्थित थे। विशेष अतिथियों में वरिष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, ओमप्रकाश चांडक, नटराज चांडक आदि मंचासीन थे।

डॉ. शांतनु भाईजी ने अपने संबोधन में बताया कि मीडिया प्रभाग माउंट आबू द्वारा चलाए जा रहे विविध जनजागरण अभियान देश में मूल्यनिष्ठ पत्रकारिता को प्रेरित कर रहे हैं। उन्होंने 26 से 30 सितंबर 2025 तक माउंट आबू में आयोजित होने वाले राष्ट्रीय मीडिया सम्मेलन की जानकारी देते हुए सभी पत्रकार बंधुओं से इसमें सहभागी होने का आग्रह किया।

कार्यक्रम की शुरुआत ईश्वरीय स्मृति के साथ दीप प्रज्वलन से हुई। ब्रह्माकुमारी अन्वी चांडक ने स्वागत नृत्य प्रस्तुत कर सभी अतिथियों का अभिनंदन किया।

संमेलन में विरसिंहदादा राजपूत, हरिभाऊ गोसावी, गजानन ठोसर, प्रा. डॉ. नितीन भुजबळ, गौरव खरे, समाधान सुरवाडे, अजय टप, कैलास काळे, श्रावण पाटील, विनोद व्यवहारे, सुधाकर तायडे, विलास खर्चे, शेख जमील सहित कई प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधि उपस्थित रहे।

कार्यक्रम का संचालन ब्रह्माकुमारी दीपाली दीदी ने किया। प्रास्ताविक ब्रह्माकुमारी अंकिता चांडक ने प्रस्तुत किया तथा आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी ने किया।

______

Tags

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media